

NCP–Shahu Alliance
sakal
कागल: ‘नगरपालिका निवडणुकीत ‘न भूतो न भविष्यती’ असे यश मिळावे, कागल तालुक्याचा आणि तालुक्यातील जनतेचे भले कसे होईल हा विश्वास घेऊन आम्ही आघाडी केली आहे. आम्ही एकत्र आल्याने ‘त्यांचा’ स्वप्नभंग झाला आहे. दोन्ही पक्ष मिळून चांगले काम करू,’ असे म्हणत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बंडखोरांना ‘अब तुम्हारी खैर नहीं’ असा इशारा दिला.