Kagal Accident : महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने कार, दोन बैलगाड्या आणि मोटरसायकल चिरडल्या...
Speeding Truck Causes : अपघातात एक बैलगाडी चालक गंभीर जखमी झाला असून चार बैलांना दुखापत झाली; एका बैलाचे शिंग तुटले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले; ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
कागल : महामार्गालगत येथील रोटे गल्लीजवळ आज सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास भरधाव ट्रकने कार, दोन बैलगाड्या आणि मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.