
शिवाजी यादव
कोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीतील कागल जनावरे उपबाजारास जेमतेम प्रतिसाद आहे. म्हणून येथील पडीक जागेचा विनियोग करण्यासाठी बाजार समितीने पावले उचलली आहेत. त्यानुसार पेट्रोल पंप, विद्युत चार्जिंग सेंटर व शेतकरी निवास बांधण्यात येईल. त्यासाठी प्रस्ताव दिला असून, मंजुरी येताच त्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे बाजार समितीला महसूलवाढीसोबत शेतकरी, व्यापारी वर्गास सुविधा मिळणार आहेत.