

Kagal Municipal Council Employee Death
esakal
Kagal Nagar Parishad : कागल नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सविता पिंटू आवळे (वय ४१) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप उफाळून आला. गेल्या २० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करूनही आरोग्य विम्यासह मूलभूत सेवा-सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आवळे यांचा मृतदेह थेट नगरपरिषद कार्यालयासमोर आणून आंदोलन केले. या घटनेमुळे कागल नगरपरिषदेतील सत्ताधारी मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखालील सत्तेच्या कारभारावरही आता सवाल उपस्थित होत आहेत.