Kagal Peth Naka Highway
esakal
उजळाईवाडी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते पेठ नाका या सुमारे ६५ किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाचे काम रखडल्याने वाहनधारकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत (Kagal to Peth Naka Six-Laning Work) आहे. जानेवारी २०२२ मध्ये कंपनीकडून सुरू झालेले काम तीन वर्षांची मुदत संपल्यानंतरही पूर्ण झालेले नाही. त्यानंतर मुदतवाढ देऊनही केवळ ५१ टक्के काम पूर्ण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला. आता उर्वरित कामासाठी तब्बल ९९४.९७ कोटी रुपयांची नवी निविदा काढली आहे.