कागल: नगरपालिकेच्या निवडणुकीत अनपेक्षितपणे झालेल्या राजकीय भूकंपामुळे मंत्री हसन मुश्रीफ व शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्यातील संघर्ष उफाळणार आहे..मुरगूडमध्ये प्रा. मंडलिक यांनी मुश्रीफ यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे कागलात मुश्रीफ-राजे गट एकत्र आल्याची चर्चा आहे. दरम्यान, पक्षाच्या आदेशामुळे कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप नेते व माजी आमदार संजय घाटगे यांची मात्र पंचाईत झाली आहे. पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्व असलेल्या कागलात यापूर्वी अनेक राजकीय भूकंप झाले आहेत. .Kolhapur News: राष्ट्रवादीचे दोन्ही गट समोरासमोर; कागलमध्ये तिरंगी लढतीचे संकेत स्पष्ट!.त्यातून पारंपरिक विरोधक ऐनवेळी एकत्र आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यावेळच्या प्राप्त परिस्थितीत लोकांनीही असे बदल स्वीकारले, पण आता गेल्या दहा वर्षापासून एकमेकांच्या विरोधात थेट पोलिस ठाण्यापर्यंत तक्रार दाखल झालेल्या मुश्रीफ-राजे गटातील एकीने मंडलिक गटासह संजय घाटगे गटात मात्र अस्वस्थता आहे..मुरगूडमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात मंडलिक-प्रवीणसिंह पाटील-भाजपचे संजय घाटगे अशी आघाडी झाली. त्याची चर्चा पूर्वीपासूनच सुरू होती. कागलमध्येही हेच चित्र पहायला मिळेल असे वाटत असतानाच मुश्रीफ-राजे गट एकत्र आल्याने खळबळ उडाली..Kolhapur Election: भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधकांची धडपड; सूर न जुळल्याने आघाड्या मात्र अडखळल्या!.या घडामोडीमागे लोकसभेचेही राजकारण आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कागल मतदार संघातून प्रा. मंडलिक यांना अपेक्षित मतदान झाले नाही. यामागे मुश्रीफ गट असल्याचा जाहीर आरोप प्रा. मंडलिक यांच्या मुलाने सोशल मीडियावर केला होता. हा वादची किनारही या घडामोडीमागे आहे..प्रा. मंडलिक गटाकडून कागलमध्ये नगराध्यक्ष पदांसह नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल आहेत, आता त्यांना गटाच्या अस्तित्वासाठी स्वबळावर लढावे लागणार आहे. या घडामोडीमुळे अलीकडेच भाजपवासी झालेल्या संजय घाटगे यांची चांगलीच पंचाईत झाली. कागलमध्ये संजय घाटगे गटाकडून १५ जणांचे अर्ज दाखल आहेत..मंत्री मुश्रीफ यांच्याशी आघाडी करून काही जागा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण भाजपकडूनच घाटगे यांना उमेदवारांना पक्षाचे ए, बी फॉर्म न देण्याची सूचना रात्री मिळाली. त्यामुळे कागल नगरपालिकेत संजय घाटगे गटाच्या उमेदवारांना अर्ज माघार घेण्याशिवाय पर्याय रहाणार नाही. त्यातून घाटगे हे चांगलेच ‘बॅकफूट’वर गेल्याची चर्चा आहे..पंधरा दिवसांपासून घडामोडीकागल नगरपालिकेच्या निवडणुकीत मुश्रीफ-राजे गट एकत्र येण्याच्या घडामोडी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहेत. काल ही माहिती उघड झाली पण त्याला अधिकृत्त दुजारा मिळाला नाही. पण आज मंत्री मुश्रीफ यांनीच ही आघाडी जाहीर करून राजकीय क्षेत्राला धक्का दिला. या अनपेक्षित आघाडीबाबत दोन्ही गटाचे कार्यकर्ते मात्र अस्वस्थ आहेत..मंडलिकांना एकाकी पाडण्याचे प्रयत्नकागलच्या निमित्ताने तालुक्याच्या राजकारणात प्रा. मंडलिक यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जाते. चंदगडमध्ये मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र आणल्यानंतर त्याची प्रतिक्रिया गडहिंग्लज नगरपालिकेत होऊन तिथे मुश्रीफ यांचा राष्ट्रवादी पक्ष एकाकी पडला. आता कागलच्या राजकारणाचे प्रतिबिंब कोल्हापूर महापालिकेसह मुरगूड नगरपालिकेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.