पुणे- बंगळूर महामार्गावरील किणी, तासवडे पथकरात दरवाढ

पुणे- बंगळूर महामार्गावरील किणी, तासवडे पथकरात दरवाढ
Updated on: 

घुणकी (कोल्हापूर) : पुणे- बंगळूर महामार्गावरील कागल-सातारा दरम्यानच्या किणी (ता. हातकणंगले) व तासवडे (जि. सातारा) येथील नाक्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या पथकरात एक जुलैपासून १० टक्के दरवाढ होणार आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने मेटाकुटीस आलेल्या वाहनधारकांना आता हाही झटका बसणार आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर दरवाढ अमलात येईल.(kagal-satara-highway-kini-tasawade-10-percent-increase-road-tax-kolhapur-news)

महामार्गाच्या कागल- सातारा टप्प्याचे २००५ च्या दरम्यान ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ योजनेतून चौपदरीकरण पूर्ण झाले. तेव्हापासून रस्ते विकास महामंडळाच्या नियोजनाखाली पथकर संकलन होत आहे. दर एक जुलैला पथकरात बदल होतो. ‘फास्टॅग’मुळे पथकरावरून होणारे वाद संपुष्टात आले. फास्टॅग नसलेल्यांकडून दुप्पट पथकर आकारला जातो.

वाढलेले डिझेल दर आणि आता पथकरात वाढीने आम्हाला गाड्याच बंद ठेवाव्या लागतील. यावर निर्णयासाठी उद्या (ता. २९) तातडीने बैठक बोलविली आहे.

-भाऊ घोंगळे, उपाध्यक्ष, जिल्हा लॉरी असोसिएशन

कोविडमुळे गेल्या वर्षी पथकरात वाढ झाली नाही. तब्बल दोन वर्षांनी केवळ दहा टक्के वाढ झाली आहे.

- प्रताप भोईटे, व्यवस्थापक, किणी नाका

पथकर दर (रुपयात)

वाहन जुने दर नवे दर

जीप/मोटार ७५ ८०

मिनीबस १३५ १४५

ट्रक/बस २६५ २९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com