म्हाकवे, ता. १६ : कागल तालुक्यातील ८४ गावांमध्ये आरोग्य विभागामार्फत कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ५६ हजार ८४७ घरांना भेटी देऊन नागरिकांची तपासणी केली. यामध्ये तालुक्यात चार नवीन कुष्ठरुग्ण आढळून आले. .या रुग्णांवर सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर औषधोपचार सुरू केले आहेत. योग्य औषधोपचार केल्यास रुग्ण शंभर टक्के बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी या रोगाबद्दल भीती बाळगू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने शोधमोहिमेवेळी केले आहे..राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तालुक्यातील सर्व घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन घरातील सर्व सदस्यांची शारीरिक तपासणी केली. ही तपासणी मोहीम १४ दिवस चालली. कुष्ठरोग शोधमोहीम तपासणी अंतर्गत कागल तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ३४ उपकेंद्रे, पाच नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतील आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन ही मोहीम राबविली. .त्यानुसार या मोहिमेत तालुक्यातील ५६ हजार ८४७ घरांना २०० जणांच्या आरोग्य पथकाने भेट दिली. यामध्ये दोन लाख ५३ हजार २७१ या एकूण लोकसंख्येपैकी दोन लाख २३ हजार ४१६ लोकसंख्येची तपासणी केली. .या तपासणीत एक हजार ६३६ संशयित कुष्ठरोग रुग्णांची तपासणी केली. या तपासणीतून चार नवीन कुष्ठरोगी आढळून आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फारूक देसाई यांचे मार्गदर्शन लाभले..आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांना कुष्ठरोग तपासणी शोधमोहीम यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. .नागरिकांनी कुष्ठरोगाबद्दल अजिबात भीती बाळगू नये. शासनाच्या वतीने कुष्ठरुग्णांना सहा ते बारा महिने मोफत औषधोपचार केले जातात. या उपचाराने रुग्ण शंभर टक्के बरा होतो. औषधोपचार घेतल्याने पुढील सर्व गुंतागुंत टाळली जाते. .नागरिकांनी या रोगाबद्दल कोणतीही भीती अथवा शंका न ठेवता शरीरावर कोणताही चट्टा आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखवून निदान करून घ्यावे.- डॉ. फारुख देसाई, कागल तालुका वैद्यकीय अधिकारी. दृष्टिक्षेपात कुष्ठरोग शोधमोहीम घटक संख्यातालुक्यातील एकूण गावे ८४मोहिमेचा कालावधी १४ दिवसभेट दिलेली एकूण घरे ५६,८४७आरोग्य पथकांची संख्या २००तालुक्याची एकूण लोकसंख्या २,५३,२७१तपासणी केलेली लोकसंख्या २,२३,४१६तपासलेले संशयित रुग्ण १,६३६आढळलेले नवीन कुष्ठरुग्ण ४ .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.