Kagal Election Results
esakal
कागल : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कागल तालुक्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व माजी आमदार संजय घाटगे यांच्या युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्हा परिषदेच्या सहापैकी सहा तर पंचायत समितीच्या बारा पैकी अकरा जागांवर मुश्रीफ व दोन घाटगे युतीच्या उमेदवारांनी विजय मिळवत तालुक्यावर (Kagal Election Results) आपली पकड अधिक मजबूत केली. या युतीसमोर शिवसेना (शिंदे गट) चे नेते माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी एकाकी पण लक्षवेधी लढत दिली.