
संजय दाभाडे
कळंबा : येथील तलावाच्या तटबंदीची (बंधारा) दुरवस्था झाली आहे. तलावातील पाणीसाठ्याचा दाब, नागरी वहिवाट व वाहनांच्या रहदारीमुळे बंधाऱ्याला अनेक ठिकाणी मोठमोठे तडे गेले आहेत. त्याचे दगडी पिचिंग निखळून पडू लागले आहेत. बंधारा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचू लागला असून, धोक्याची घंटा वाजू लागली आहे. दक्षतेचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने व कळंबा ग्रामपंचायतीने तलावाचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची गरज आहे.