

Karveer Chavdi fire incident
sakal
कुडित्रे : कसबा करवीर चावडीतील खिडकीची जाळी फाडून कागदपत्रे पेटवून दिली होती. आज दुसऱ्या दिवशी तहसीलदार स्वप्नील पवार यांनी कार्यालयातील कागदपत्रे व्यवस्थित लावण्यासाठी सात कोतवालांची नियुक्ती केली. दरम्यान, आणखी आठ दिवस कार्यालय बंद राहणार असल्याचे कार्यालयीन सूत्रांनी सांगितले.