esakal | श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा; रात्री होणार जागर : Ambabai Puja Kolhapur
sakal

बोलून बातमी शोधा

श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा

श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा; रात्री होणार जागर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नवरात्रोत्सवातील अष्टमी निमित्त आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. आज रात्री देवीचा जागर होणार असून रात्री साडेनऊ वाजता देवी नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होईल. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर देवीचे वाहन असेल. महाद्वार चौक, गुजरी, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, गुरु महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुन्हा महाद्वार चौकातून मंदिर असा नगर प्रदक्षिणेचा मार्ग राहील. नगर प्रदक्षिणेनंतर रात्री मंदिरात विविध धार्मिक विधी होतील. उद्या (गुरुवारी) सकाळी नऊपासून मंदिर दर्शनासाठी खुले होईल. दरम्यान, श्रीपूजक मयूर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर, सोहम मुनीश्वर, सुकृत मुनीश्वर यांनी आजची पूजा बांधली.

loading image
go to top