

Election officials attending voting process training at Vivekanand College in Karveer Taluka.
sakal
कोल्हापूर : मतदान प्रक्रियेत अर्ज कसे भरायचे, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची जबाबदारी कोणती, प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापासून संपेर्यंत कोणती जबाबदारी पार पाडायची, असे संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या माहितीचे धडे आज निवडणूक प्रक्रियेतील करवीर तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथे देण्यात आले. तीन टप्प्यात झालेल्या या प्रशिक्षणात २१०० जण सहभागी झाले.