वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी राहत्या घराजवळ जाऊन संशयिताकडे फोटो, व्हिडीओबाबत चौकशी केली. त्याने फोटो व व्हिडिओ आपलेच असल्याचे आणि त्यानेच ते ‘अपलोड’ केल्याचे सांगितले.
ढालगाव /कुपवाड : ‘तो’ शिकार करायचा. फोटो काढायचा. समाजमाध्यमांवर ‘अपलोड’ करायचा. कधी ससा, कधी कोल्हा, घोरपड... ते नजरेत आलं आणि वन विभागाने त्याच्यासाठीच सापळा रचला. त्याने अलगद सगळी कबुली देऊन टाकली. दुधेभावीचा ‘शिकारी बाब्या’ ऊर्फ सोशल मीडियातला ‘बाब्या किंग’आता गजाआड झाला आहे. कवठेमहांकाळ परिक्षेत्रात वन विभागाने (Kavathemahankal Forest Department) ही कारवाई केली.