विरोधी गटातून निवडून आलेले 'हे' दोन संचालक सेनेच्या गळाला? खासदार मंडलिकांचं सूचक वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Mandlik

'निवडणुकीत शिवसेना अत्यंत ताकदीनं लढलीय.'

विरोधी गटातून निवडून आलेले 'हे' दोन संचालक सेनेच्या गळाला?

KDCC Bank Election : ही निवडणूक नुरा कुस्ती नक्कीच नव्हती. कारण, लोकांनी जिल्हा बँकेसाठी भरभरून मतदान केलंय, त्यामुळं इथं नुरा कुस्तीचा विषयच येत नाही. बिनविरोधपेक्षा लोकांना मतदान करण्याची इच्छा खूप होती. त्यामुळं ९८ टक्के मतदान झालं. या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) अत्यंत ताकदीनं लढलीय. आमच्याकडं साधनसामुग्री नसतानाही आम्हाला जनाधार मिळाल्यानेच आम्ही विजयी झालो, असं स्पष्ट मत कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी व्यक्त केलंय. ते मतमोजणी केंद्रावर बोलत होते.

हेही वाचा: माजी आमदाराच्या सुपुत्राचा मुश्रीफांच्या कट्टर कार्यकर्त्याकडून 'करेट' कार्यक्रम

खासदार मंडलिक पुढे म्हणाले, सत्ताधाऱ्यांमधील दोन जागा आमच्याच असतील. 'वेट अॅण्ड वॉच, (Wait and Watch) त्यामुळं बॅंकेत आमचीच सत्ता असेल, असं सूचक वक्तव्य त्यांनी दिलंय. मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि शाहूवाडीचे रणवीर गायकवाड हे आमचेच आहेत, त्यामुळं जिल्हा बँकेत शिवसेनेच्या जागा आणखी वाढणार आहेत.

हेही वाचा: कसला भारी योगायोग! राज्यमंत्र्यांच्या गाडीचा नंबर 98 अन् मतंही 98

मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. मतदार जिल्हा बँकेत कोणाला निवडून द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. जिल्हा बँक वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असं त्यांनी शेवटी सांगितलं. जिल्ह्यातील १३ ठिकाणी ४० केंद्रांवर ७ हजार ६५१ पैकी तब्बल ७ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शिवसेना पुरस्कृत पॅनेलला या निवणुकीत 6 जागा मिळाल्या आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top