कसला भारी योगायोग! राज्यमंत्र्यांच्या गाडीचा नंबर 98 अन् मतंही 98; तालुक्यात यड्रावकरच 'किंग' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Patil Yadravkar

विजयाची खात्री असल्यानंच यड्रावकर समर्थकांनी मतदानादिवशी मोठ-मोठे फ्लेक्स लावून फटाक्यांची आतषबाजी केली होती.

कसला भारी योगायोग! राज्यमंत्र्यांच्या गाडीचा नंबर 98 अन् मतंही 98

जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन साखर सम्राटांतील लढतीनं लक्षवेधी ठरलेल्या शिरोळ तालुका विकास संस्था गटात राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांनी 98 मतं घेत या तालुक्यात आपण ‘किंग’ असल्याचं दाखवून दिलंय. या गटातून त्यांच्या विरोधात ‘दत्त-शिरोळ’चे अध्यक्ष गणपतराव पाटील (Ganapatrao Patil) होते, त्यांना अवघी 51 मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे, राज्यमंत्री पाटील-यड्रावकर यांच्या गाडीचा नंबर 9889 आहे, तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांना 98 मतं पडली आहेत.

हेही वाचा: माजी आमदाराच्या सुपुत्राचा मुश्रीफांच्या कट्टर कार्यकर्त्याकडून 'करेट' कार्यक्रम

या गटात पाटील यांच्या बाजूनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्वतः रिंगणात उतरून ताकद लावली होती. एवढंच नव्हे, तर मतदान केंद्रावर पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणूनही ते स्वतः दिवसभर बसून होते. या दोघांबरोबरच शेट्टी यांचीही या गटात प्रतिष्ठा पणाला लागली होती, त्यात अखेर यड्रावकरांनी बाजी मारलीय. राजेंद्र पाटील-यड्रावकर 47 मतांनी विजयी झाले आहेत. याची खात्री असल्यानेच यड्रावकर समर्थकांनी मतदानादिवशी मोठ-मोठे फ्लेक्स व फटाक्यांची आतषबाजी केली होती. जयसिंगपूर येथील यड्रावकर चेंबर्समध्ये समर्थकांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केलाय.

हेही वाचा: 'काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही मोदींचं काहीच वाकडं करु शकत नाही'

दरम्यान, सेवा संस्था गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी करत माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. अशोकराव माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीचे चंगेजखान पठाण, अनिलराव यादव यांच्यासह नेत्यांनी विरोधी मोट बांधली होती. परंतु, या सर्वांचंच पानिपत झालंय.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top