

Kolhapur Theatre Renovation Halted Strange Excuses by Officials Artists Plan Massive Protest
Esakal
कोल्हापुरातलं संगीतसूर्य केशवराव नाट्यगृह सव्वा वर्षापूर्वी लागलेल्या आगीत जळून खाक झालं. त्यानंतर प्रशासनाने एक वर्षात काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलं. पण एक वर्षात मुख्य छताचंही कामकाज पूर्ण झालं नसल्यानं रंगकर्मींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम लवकर आणि योग्य रितीने पूर्ण व्हावं अशी मागणी आता नाट्यप्रेमींकडून होतेय. २५ कोटींचा निधी नाट्यगृहाच्या कामासाठी मिळाला आहे, तरीही काम केलं जात नाहीय आणि सातत्यानं वेगवेगळी कारणं सांगण्यात येतायत असा आरोप कलाकारांनी केला आहे. विषय गंभीर आहे, आपण खंबीर राहिलं पाहिजे असं म्हणत रंगकर्मींनी नाट्यप्रेमींना केशवराव भोसले नाट्यगृहासाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय.