
कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. कलादालन इमारतीतील तळमजल्यावरील जुने बांधकाम काढले जात आहे. तसेच खाऊ गल्लीकडील भिंतीचीही दुरुस्ती केली जाणार आहे. आता पहिल्या टप्प्यातील गॅलरीवरील छताचे काम राहिले आहे.