

Police investigate
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर दारात गुलाल फेकल्याच्या गैरसमजातून केर्ली (ता. करवीर) येथे सहा जणांना लोखंडी गज, काठ्यांनी मारहाण करण्यात आली. कृष्णात हणमंत चौगुले, वैशाली चौगुले, सविता चौगुले, राहुल दिनकर चौगुले, सुधीर भीमराव खडके, विशाल बाबासो खडके अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी विरोधी गटाच्या सोळा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.