

10-Foot King Cobra Found in Kolhapur, Panic Near Factory
esakal
King Cobra Rescue Kolhapur : रविवारी (ता. २८) सुटीचा दिवस असल्याने मोटणवाडी-पारगड मार्गावर पर्यटकांची गर्दी होती. गुडवळे हद्दीत रस्त्यावर काही पर्यटकांना मोठ्या सापाचे दर्शन झाले. त्याला पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी होऊ लागली. वन विभागाचे कर्मचारी शंकर तेरवणकर यांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पर्यटकांना सुरक्षित अंतरावर हटवून साप व नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली.