esakal | कोल्हापूर: मनपातर्फे १६० कृत्रिम विसर्जन कुंड
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: मनपातर्फे १६० कृत्रिम विसर्जन कुंड

कोल्हापूर: मनपातर्फे १६० कृत्रिम विसर्जन कुंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेने गणेशोत्सव काळात यंत्रणा सज्ज ठेवली आहे. महापालिकेची विविध पथके उत्सव काळात नागरिकांच्या मदतीसाठी तयार आहेत. कोरोनाची भीती असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांनी पत्रकार परिषदेत केले. शहरामध्ये व प्रभागामध्ये ठिकठिकाणी विसर्जनासाठी महापालिकेमार्फत १६० कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा: शॉकने संपवले माऊलीचे जीवन; लेकराचा 'लळा' पाहून गावही हळहळले

महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी साधनसामुग्रीसह तैनात असतील. तसेच विद्युत विभागाने विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने विसर्जन ठिकाणांची तातडीने साफसफाई करण्यात येणार आहे. शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये.

तसेच नागरिकांची गर्दी होऊ नये, म्हणून महापालिकेच्यावतीने विसर्जन कुंड व निर्माल्य कुंडाची व्यवस्था केलेली आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सहा मंडळांना मांडवाची रुंदी कमी करण्यास भाग पाडल्याचे सागितले अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबळे उपस्थित होते.

दीड दिवसाच्या विर्सजनासाठी २४ ठिकाणी कुंड

-विभागीय कार्यालय क्र. १: गांधी मैदान अंतर्गत – तांबट कमान, ईराणी खण, जरगनगर कमानी, रामानंदनगर, मारुती मंदिरजवळ, अंबाई जलतरण तलाव

-विभागीय कार्यालय क्र. २: छत्रपती शिवाजी मार्केट अंतर्गत तोरस्कर चौक, जामदार क्लब, गंजीवली खण, शुक्रवार पेठ पोलिस चौकी, गंगावेश चौक, फुलेवाडी फायर स्टेशन

-विभागीय कार्यालय क्र.३: राजारामपुरी अंतर्गत व्यापार पेठ पाण्याची टाकी, आर्यविन ख्रिश्चन हायस्कूल, राजारामपुरी गार्डन जगदाळे हॉल, राजारामपुरी ९ वी गल्ली रेणुका मंदिर, राजारामपुरी ९ नं. शाळा, टेंबलाई मंदिर विक्रमनगर, सायबर चौक, राजेंद्रनगर सोसायटी

-विभागीय कार्यालय क्र.४: ताराराणी मार्केट अंतर्गत रुईकर कॉलनी नर्सरी ग्राऊंड, बापट कॅम्प घाट, कसबा बावडा घाट, रमणमळा रोड, सासने ग्राऊंड

घरगुती गौरी गणपती विसर्जन व्यवस्था

पवडी विभागाचे कर्मचारी- 200

टँम्पो-90

हमाल- 2

जेसीबी- 4

loading image
go to top