

कोल्हापुरात गेल्या २० वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या दोन मित्रांमध्ये रात्रीच्या जेवणावरून वाद झाला.
esakal
killed Over Dinner Dispute : भाजी चिरून देण्याच्या क्षुल्लक कारणावरून आज चाकूने भोसकून परप्रांतीय मजुराचा खून करण्यात आला. मंगल बिभीषण मांझी (वय ३५, सध्या रा. संभापूर, मूळ ओडिशा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित देवाश्री प्रफुल्ल चंदन (२६) याला ताब्यात घेतले आहे. संभापूर (ता. हातकणंगले) येथे रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.