
कोल्हापुरातील अपघातात तिघांचा मृत्यू होऊन कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
esakal
Accident In Kolhapur : कौलव येथे आज झालेल्या अपघाताने एक नव्हे, तर तीन कुटुंबांवर आघात झाला. दुःख किती वाटेने यावे आणि किती जणांनी सोसावे, हेच कळण्यापलीकडे झाले. मामांनी सांभाळलेले भाऊ-बहीण गेलेच; परंतु वडील नसलेल्या मुलाच्या डोईवरील आईचे छत्र हरपले, एका पत्नीच्या संसाराची धूळधाण झाली आणि भावाच्या घरची एकुलती एक पणती विझली. दिवाळी साजरी करण्याच्या आनंदात हसत्या-खेळत्या कुटुंबावर दाही दिशांनी आभाळ कोसळले. ‘मामा ...असं कसं झालं हो हे!’ असे म्हणून भाच्याने फोडलेला टाहो काळीज फाडणारा होता.