
सुनील पाटील
कोल्हापूर : जिल्ह्यात उद्योग, दुग्ध आणि पशुसंवर्धन, खाण व दगड खाणकाम, बांधकामामधून जिल्ह्याच्या उत्पन्नात गेल्यावर्षीच्या तुलनेत १४ हजार ८६ कोटी ९८ लाखांची भर पडली आहे. गेल्यावर्षी जिल्ह्याचे एकूण उत्पन्न ९४ हजार ४४६ कोटी २८ लाख रुपये होते. यावर्षी एक लाख आठ हजार ५३३ कोटी २६ लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे; मात्र अवकाळी पाऊस, पुरासह इतर अस्मानी संकटांमुळे कृषी उत्पन्नात २५६ कोटी ८९ लाख रुपयांची घट झाली आहे. कोल्हापूर जिल्हा सांख्यिकी विभागाकडून झालेल्या सर्व्हेमध्ये ही माहिती समोर आली आहे.