कोल्हापूर : पोह्यांच्या पाककृतीला नावीन्याची जोड उच्चशिक्षित तरुणांकडून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pohe

कोल्हापूर : पोह्यांच्या पाककृतीला नावीण्याची जोड

पोहे हा देशभरात कुठेही सहजपणे उपलब्ध होणारा कच्चा खाद्य पदार्थ. तो भिजवला, शिजवला, भाजला किंवा तळला की, त्याचे चविष्ट पदार्थ बनतात. अशा पोह्याची चव प्रत्येकाला हवीहवीशी वाटते म्हणूनच घरोघरीचा सकाळचा नाष्टा किंवा घरी दिवसभरात घेरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार पोह्याच्या डीशपासून होतो. सकाळी घाई गडबडीत कामाला निघाल्यानंतरच्या रस्त्यात चहा नाश्‍त्याच्या गाडीवर किंवा हॉटेलात सहज उपलब्ध होणारे पोहे इथंपासून ते वधू परीक्षेपर्यंत पारंपरिक डीश रितीरिवाजाचा भाग बनली आहे. असे मराठमोळी आवडीचे पोहे विविध आपुलकीचा हक्काचा खाना बनला आहे. पोह्याची वैशिष्ट्ये व मागणी विचारात घेऊन कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे अशा विविध भागांतील पाच उच्चशिक्षित तरुण एकत्र आले. त्यांनी या पोह्यांना बहुढंगी चवीचे कोंदण दिले.

नवं काहीतरी टेस्ट केल्याचा ‘फिल’

पोह्याच्या नव्या पाककृती शोधल्या तर काही पारंपरिक पोह्याच्या पाककृतींना नावीन्याची जोड दिली. तब्बल पंधरा प्रकारचे चवीचे पोहे बनवले. पुण्याच्या खवय्यांनी त्याला पसंती दिली तसे हा ब्रॅॅण्ड कोल्हापुरातही आला. येथील ताराबाई पार्कातील ‘आम्ही पोहेकर’ ही शाखा येथे सुरू आहे. पंधरा प्रकारच्या चवीचे पोहे येथे मिळतात. एका बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये एकाच प्रकारचे २० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत पोहे मिळतात. सकाळी पोटभर नाश्‍ता एक दोन प्लेटमधून सहज उरकला जातो. नवं काहीतरी टेस्ट केल्याचा, तृप्त झाल्याचा ‘फिल’ येतो.

पोहे मिसळ ते पोहेभेळ...

कोल्हापूरचे अभिषेक मगदूम म्हणाले की, एखाद्याने सात दिवस पोहेच खायचे ठरवले तर सातही दिवस पंधरा प्रकारच्या वेगवेगळ्या चवींचे पोहे खाताना मनाला तृप्तीचा आनंद मिळल्याची पसंती खवय्ये देतील. यात इंदोरी पोह्यात वापरली जाणारी रसलानी शेव, डाळींबाच्या बिया, दडपे पोह्यात असलेली अस्सल कोकणी चव, चिझ पोह्यातील उकडी बटाट्यात भरलेले चिझ त्याचा फ्राय, आलू टिक्का डीशच्या धर्तीवर बनविलेला आलू पोहे, तर नागपुरी चटणीचा खास रस्सा मारलेली, कडधान्याची उसळ लावलेली नागपुरी तर्री पोहे किंवा दही पोह्यावर घातलेला बॅडगी मिरचीच्या तिखटाचा लाल तडका झणझणीत चवीमुळे रूची वाढते, तर पोहे मिसळ तर सर्वाधिक लाजवाब ठरावी अशी आहे. मक्का चिवडा, शेव चिवडा, फरसाण असे विविध पदार्थ एकत्र करून ते पोह्यात मिसळून पोहे मिसळ बनवली जाते किंवा थोड्याफार फरकाने अशीच खमंग पोहेभेळ खवय्यांच्या पसंतीस उतरली आहे.

कोल्हापूर: क्षुधाशांतीचा ‘फिल’ व तृप्तीचा आनंद देणाऱ्या, खमंग चव जिभेवर रेंगाळणाऱ्या कांदा पोह्याची पारंपरिक पद्धतीची चव सर्वपरिचित व पसंतीची आहे. अशा चविष्ट पोह्यांना पाच उच्चशिक्षित तरुणांनी बहुढंगी चव दिली आहे. ‘आम्ही पोहेकर’ नावाने बनवलेला हा स्टार्टअप सध्या लोकप्रिय ठरत आहे. एकाच वेळी राज्यातील विविध प्रादेशिक चव व पाककृतीचे पोहे खवय्यांची हौस भागवत आहेत.

पुणे, मुंबई, उदगीर, सांगोला, बारामती, लातूरसह अन्य राज्यांत २३ ठिकाणी आम्ही पोहेकरच्या शाखा आहेत. येथील पोहे खवय्यांच्या आवडीचे बनले आहेत. पोहे चविष्ट व्हावेत यासाठी आम्ही पाककृती शोधल्या. वेगवेगळ्या भागातील पोह्याची चव अन्य भागातील लोकांनाही चाखता यावी, असा आमचा उद्देश होता. लोकांची मिळणारी पसंती पाहतो तेव्हा ती यशस्वी झाल्याचे दिसत आहे.

- संकेत शिंदे, संकल्पक, आम्ही पोहेकर या आहेत डिश...

घरचे पोहे, इंदोरी पोहे, कोकणी पोहे, दडपे पोहे, पोहे दही तडका, नागपुरी तर्री पोहे, भेल पोहे, पोहे चिझ, पोहे मिसळ, पोहे न्युट्रीप्लेट, पोहे बॉल्स, पोहे नगेट्स, पोहे चिझ, बॉल्स पोहे, बर्गर व पोहे चहा.

‘आम्ही पोहेकर’मध्ये १५ प्रकारच्या डिश

Web Title: Kolhapur Adding Innovation Pohya Cookinghighly Educated Youth

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..