अशोक धोंगें प्रकरणी प्रशासनाची नामुष्‍की

एकतर्फी कार्यमुक्‍तीचा आदेश रद्द; उबाळे, पानारी यांना कार्यमुक्‍तीचा ठराव
kolhapur administration Executive Engineer Rural Water Supply Department ZP Ashok Dhonge case
kolhapur administration Executive Engineer Rural Water Supply Department ZP Ashok Dhonge casesakal
Updated on

कोल्‍हापूर : जिल्‍हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांना एकतर्फी कार्यमुक्‍त करण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता. या आदेशावरून आज झालेल्या जिल्‍हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दोन तास खडाजंगी चर्चा झाली. सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे प्रशासन अक्षरश: हतबल झाले. सदस्यांनी अर्थसंकल्‍पीय कामकाज अडवून ठेवत ढोंगेंवरील कारवाई मागे घेण्यास भाग पाडलेच. मात्र त्याचवेळी यापूर्वी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे व ग्रामीण विकास यंत्रणेचे सचिन पानारी यांच्या कार्यमुक्‍तीचा एकमुखी ठराव करत, शेवटच्या सभेत लोकप्रतिनिधींची ताकत दाखवून दिली.

अध्यक्ष राहुल पाटील यांच्या उपस्‍थितीत सभागृहातील अखेरच्या अंदाजपत्रकीय सभेचे राजर्षी शाहू सभागृहात आयोजन केले होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी व सर्व पदाधिकारी उपस्‍थित होते. या वेळी सभा सुरू होताच माजी सभापती वंदना मगदूम व स्‍वाती सासणे यांनी पदाधिकारी यांच्या समोर येत श्री. धोंगे यांच्या एकतर्फी कार्यमुक्‍तीबाबत विचारणा केली. जोपर्यंत त्यांना कामावर घेतले जात नाही, तोपर्यंत कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला.

प्रा. शिवाजी मोरे यांनीही या आदेशाबाबत नाराजी व्यक्‍त करत हा लोकशाहीचा खून असल्याचे सांगितले. प्रसाद खोबरे यांनी थेट सत्ताधाऱ्यांना आव्‍हान देत या प्रकरणी मतदान घेण्याची मागणी केली. संतापलेल्या सासणे व सविता चौगले यांनी तर यापूर्वी कोणकोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्या‍च्या बदल्यांचे ठराव झाले, त्यावर काय कारवाई केली, अशी विचारणा केली. हा वाद पेटतच गेला. अध्यक्ष पाटील यांनी धोंगे यांच्याबाबतचे आदेश आता मागे घेता येणार नसल्याचे सांगितल्याने सदस्य अधिकच आक्रमक झाले. यावर संतापलेल्या सदस्यांनी व्यासपीठासमोर ठिय्‍या ठोकला. राजवर्धन निंबाळकर, अशोक माने, भोगण यांच्यासह या सदस्यांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

श्री. धोंगे यांच्या बदलीला विरोध असताना ही बदली कशी योग्‍य आहे?, हे हंबीरराव पाटील, सर्जेराव पाटील पेरीडकर, युवराज पाटील सभागृहाला सांगत होते. मात्र विषय अधिकच चिघळत होता. यावर पक्षप्रतोद उमेश आपटे यांनी अध्यक्ष पाटील व श्री. चव्‍हाण यांना तोडगा काढण्यासाठी तयार केले. चर्चा सुरू असतानाच भगवान पाटील यांनी प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्‍त करत आपण यशवंतराव चव्‍हाण यांच्या पुतळ्याच्या आवारात उपोषण करत असल्याची घोषणा केली.

परिस्‍थितीचा विचार करून अध्यक्ष पाटील यांनी धोंगे यांच्या कार्यमुक्‍तीचा आदेश मागे घेत असल्याचे जाहीर केले. तसेच याप्रकरणी चौकशी समिती नेमून पुढील कारवाई होईपर्यंत धोंगे यांना सक्‍तीच्या रजेवर पाठवण्याची ग्‍वाही दिली.

सेवाज्येष्‍ठ उपअभियंत्याला पदभार देण्याचा ठराव

श्री. धोंगे यांचा कार्यभार काढून सध्या शाहूवाडी येथील उपअभियंत्यांकडे दिला आहे. मात्र हा पदभार देताना सेवाज्येष्‍ठता डावलली असल्याची तक्रार सदस्यांनी केली. बांधकाममधील असाच प्रकार न्यायालयात गेला. या प्रकरणात प्रशासनाला युटर्न घ्यावा लागला. त्यामुळे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंत्यांचा पदभार हा सेवाज्येष्‍ठ उपअभियंत्यांला द्यावा, असा एकमुखी ठराव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com