

Airport Road Block Issue
sakal
उजळाईवाडी : तामगाव-नेर्ली परिसरातील ग्रामस्थांनी रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना अडवले. मात्र, या झटापटीनंतर विमानतळ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.