

Massive Devotee Rush
sakal
कोल्हापूर : नाताळची सुटी आणि आगामी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात पर्यटकांची प्रचंड मांदियाळी पाहायला मिळत आहे. सलग सुट्यांचे औचित्य साधून राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक करवीर नगरीत दाखल झाले असून, यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्ते, मंदिरे आणि पर्यटनस्थळे गर्दीने फुलून गेली आहेत.