

Kolhapur village wildlife incident
esakal
Kolhapur Students Panic Wild Animal Entry : अंबप (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात अचानक गवा दाखल झाल्याने विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडाली. आज सकाळची शाळा असल्याने नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेची मराठी शाळेत मुले दाखल झाली. विद्यार्थ्यांचे शाळेच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे कवायत सुरू होती. अचानक शाळेच्या मैदानात गवा शिरला आणि शिक्षक विद्यार्थी धावपळ सुरू झाली.