Kolhapur : पोलिस नाईक तिवडेला १ कोटी लाचप्रकरणी अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anti corruption police arrests

Kolhapur : पोलिस नाईक तिवडेला १ कोटी लाचप्रकरणी अटक

कोल्हापूर : जमीन दाव्याचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी एक कोटीची लाचेची मागणी केल्याप्रकरणी बडतर्फ पोलिस नाईक याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. जॉन वसंत तिवडे (सध्या रमणमळा) असे संशयिताचे नाव असल्याचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले. संशयित तिवडे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचा अंगरक्षक होता.

एमआरटी कौसिल पुणे येथील जमिनीच्या दाव्याचा निकाल तक्रारदारांच्या बाजूने लावून देण्यासाठी एक कोटीची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ ऑगस्टला गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, संशयितावर कुपवाड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये कारवाई केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. त्याला कळंबा कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची कोठडी सुनावली असल्याचे बुधवंत यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur Anti Corruption Department Arrested Police Naik One Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..