Kolhapur Anti-Encroachment Drive : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची बेकायदेशीर भिंती जमीनदोस्त; ४० अतिक्रमणांना नोटीस देत महापालिकेची जोरदार मोहीम
Illegal Walls Demolished : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दोन बेकायदेशीर संरक्षक भिंती महापालिकेने पाडत मोठी कारवाई केली असून परिसरातील ४० अनधिकृत शेड, बांधकामे आणि फलकांना सात दिवसांची नोटीस देत कडक भूमिका घेतली आहे.
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील इमारतींनी बांधलेल्या दोन बेकायदेशीर संरक्षक भिंती आज महापालिकेने पाडल्या. त्याचबरोबर सामाईक अंतरामधील बांधकाम, शेड अशा ४० अनधिकृत बांधकामांना नोटीस दिल्या आहेत.