
Kolhapur Pachgaon Crime : पाचगाव येथील अशोक पाटील यांच्या खूनप्रकरणातील संशयित आरोपी ओंकार विद्याधर सूर्यवंशी (वय ३०, रा. शांतिनगर पाचगाव, सध्या रा. निपाणी) याच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून तो खूनप्रकरणातील मुख्य संशयित दिलीप जाधव ऊर्फ डी. जे. याला भेटण्यासाठी आल्याचे समोर आले. सूर्यवंशी याचे मिरवणुकीने आगमन व जल्लोषाचे व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी याची दखल घेत कारवाई केली.