KDCC Result: महिला गटातून सत्तारूढ आघाडीच्‍या निवेदीता माने, श्रुतिका काटकर विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nivedita Mane

KDCC Result : सत्तारूढ आघाडीच्या निवेदीता माने, श्रुतिका काटकर विजयी

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (KDCC Bank Elections Result) निवडणुकीत महिला प्रतिनिधी गटातून सत्तारूढ आघाडीच्‍या उमेदवार माजी खासदार श्रीमती निवेदीता माने व श्रुतिका काटकर (Nivedita Mane, Ritika Katkar) यांनी दणदणीत विजय मिळवला.या गटातील माजी संचालक पी. जी. शिंदे यांच्या पत्नी सौ. लतिका यांच्यासह काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते ॲड. सुरेश कुराडे यांच्या पत्नी सौ. रेखा यांचा पराभव झाला.

हेही वाचा: ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीचे सार्थक; स्मिता गवळींची बाजी

माजी खासदार माने तिसऱ्यांदा जिल्हा बँकेत निवडून आल्या आहेत तर सौ. काटकर यांनी पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे. या दोन्हीही उमेदवारांनी विरोधी आघाडीच्या उमेदवारांचा मोठ्या फरकांनी पराभव केला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top