kolhapur politics latest update

kolhapur politics latest update

esakal

Kolhapur Politics : कोल्हापुरात भाजपला खिंडार? इंगवले गट एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत करणार प्रवेश

Kolhapur BJP setback : कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इंगवले गट एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Published on

Kolhapur political news : (अतुल मंडपे) : येत्या आठवडयाभरातच हातकणंगले तालुक्यात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता आहे. जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले आणि त्यांचे चिरंजिव आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले आणि त्यांचे कार्यकर्ते उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे गटांत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे हातकणंगले सह तालुक्यांतील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. तथापि अरुणराव इंगवले यांचे कनिष्ठ बंधू राजू आणि अमर इंगवले हे मात्र भाजपची साथ सोडण्यास तयार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com