
Kolhapur Muncipal Politics : कोल्हापूर महानगरपालिकेची बहुचर्चित हद्दवाढ करण्यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी आज मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. त्यानुसार उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा, तसेच बालिंगा, पाडळी, उजळाईवाडीचे वाढीव गावठाण, अशा आठ गावांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात येणार आहेत. मात्र, किती कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करायची, हे ठरलेले नाही.