

Kolhapur tragic accident destroys three families
esakal
Kolhapur Tragic Incident : कोणी कामानिमित्त कराडला जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत... कोणी काही वेळ थांबून पुढे जाण्याआधी शेकोटीजवळ आलेला... काही मिनिटांच्या ओळखीतून चौघे एकमेकांची विचारपूस करीत होते... इतक्यात त्यांचा काळ बनून आलेल्या मोटारीने चौघांना फरफटत नेले. तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौथा मृत्यूशी झूंज देत आहे. आज सकाळी तावडे हॉटेल चौकात झालेला अपघात पाहून बाजूने जाणारा प्रत्येकजण हळहळला. काही वेळासाठी शेकोटीला थांबलेल्या तिघांना जीवाला मुकावे लागले.