
Kolhapur News : ‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला मिळू नये व मला उमेदवारी मिळू नये, यासाठी मोठे षड्यंत्र रचले गेले. हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाऊन मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी मिळाली; परंतु कोणतीही कल्पना न देता त्यांनी अचानक माघार का घेतली, असा सवाल करत शहरात राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट आमच्या विरोधकांनाच मदत केली, असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.