Kolhapur City Expansion : गुजरातचा रस्ता चांगला, महाराष्ट्रातील खराब रस्त्यांमुळे मला पालकमंत्री म्हणून लाज वाटते'; मंत्री हसन मुश्रीफांचा सरकारला घरचा आहेर

Hasan Mushrif Supports Kolhapur City Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करून विरोध नसलेल्या लगतच्या गावांचा समावेश करण्यासाठी मुंबईत प्रयत्न करणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. खराब रस्ते आणि सातारा-कागल महामार्गाच्या कंत्राटदारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
Hasan Mushrif Maharashtra road condition statement

Hasan Mushrif Maharashtra road condition statement

esakal

Updated on

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ व्हावी, या भूमिकेचा मी आहे. ज्या गावांचा विरोध नाही, त्यांना लवकरात लवकर सामावून घ्यावे, अशी आपली सातत्याने मागणी (Kolhapur city expansion latest news) आहे. त्यामुळे यासाठी मीच पुढाकार घेऊन मुंबईला गेल्यानंतर शहराजवळ असलेल्या गावांबाबत अधिसूचना काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे प्रसिद्धीमाध्यमांशी संवादावेळी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com