काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यातील पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने दुरुस्तीच्या कामाची प्रक्रिया सुरू आहे.
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणाची (Kalammawadi Dam) गळती काढण्याचे काम जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे साहजिकच उन्हाळ्यापर्यंत त्यातील पाणीसाठा कमी करावा लागणार आहे. परिणामी तेथून शहराला पाणी देणाऱ्या ‘थेट पाईपलाईन योजने’ला ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडून निम्म्या कोल्हापूर शहराला (Kolhapur City) अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) पर्यायांचे नियोजन सुरू केले आहे.