kolhapur : महाडिकांविरुद्ध कोण?

हातकणंगले तालुका; आवाडे यांच्या भूमिकेकडे लक्ष
kolhapur :  महाडिकांविरुद्ध कोण?
kolhapur : महाडिकांविरुद्ध कोण?sakal

हातकणंगले : जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हातकणंगले तालुक्यांतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काही निवडणुकांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाडिकांना आव्हान दिल्याने ही निवडणूक महाडिकांसाठी अस्मितेची असल्याने त्यांनी कंबर कसली आहे. तरीही विरोधी गटांकडे त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवारच नसल्याने महाडिकांविरोधात कोण? हाच महत्त्‍वाचा प्रश्न आहे. मंत्री पाटील महाडिकांना रोखण्यांत यशस्वी होणार का? की महाडिक पलटवार करणार? हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.

तालुक्यांतून सध्या महादेवराव महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजूबाबा आवळे, विलास गाताडे असे चौघे संचालक आहेत. यापैकी महाडिक २५ वर्षे सलग विकास सोसायटी गटांतून प्रतिनिधित्व करत आहेत; तर उर्वरित तिघेही राखीव जागांवर प्रतिनिधित्व करतात. आमदार प्रकाश आवाडे महाडिक गटांसोबत राहणार की वेगळी भूमिका घेणार याचीही उत्सुकता आहे. तालुक्यांत एकूण १०१२ ठराव धारकांचे मतदान आहे.

kolhapur :  महाडिकांविरुद्ध कोण?
दिल्ली: CBI कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

यात कोणी किती ठराव जमा केले आहेत, हे गुलदस्त्यात आहे. मात्र, मोठ्या प्रमाणांवर मतदान असल्याने तालुका निकालांत निर्णायक ठरणार आहे. तालुक्यातून परत एकदा महाडिक यांच्याबरोबरच राहुल आवाडे, आवळे, निवेदिता माने यांच्यासह भटक्या विमुक्त गटांतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संदीप कारंडे यांची नावे चर्चेत आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या महाविकास आघाडीविरोधात महाडिक असाच सामना प्रामुख्याने रंगणार असून, राजू शेट्टी महाडिकांसोबत जाण्याची शक्यता आहे.

दृष्‍टिक्षेपात तालुका...

विद्यमान संचालक : महादेवराव महाडिक, राजूबाबा आवळे, निवेदिता माने, विलास गाताडे पात्र संस्था : १०१२ सेवा संस्था गट : १३९ खरेदी-विक्री प्रक्रिया संस्था : ४५ पतसंस्था, नागरी बँक गट : २२३ पाणीपुरवठा व इतर संस्था : ६०५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com