

Cooperative Sector Employees
जिल्ह्यातील सहकारी दूध संघ, साखर कारखाने, सहकारी सेवा संस्था आणि दूध संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मूळ काम सोडून आता राजकीय रिंगणात उतरवले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आपला नेता, आपली संस्था, आपले कर्मचारी’ हा अव्यक्त पण उघड गाजावाजा असलेला फॉर्म्युला धडाधड राबवला जात आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राची शिस्त, नियम आणि संस्थात्मक स्वायत्तता धुळीस मिळत असल्याचे चित्र आहे.
- सुनील पाटील, कोल्हापूर