इचलकरंजीत लसीकरणाबाबत उदासिनता : हजारो डोस शिल्लक

विशेष मोहिमेनंतरही हजारो डोस शिल्लक
corona vaccination
corona vaccinationcorona vaccination

इचलकरंजी : शहरात आज विशेष मोहिम हाती घेवूनही कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत प्रचंड उदासिनता दिसून आली. या मोहिमेत ९२५० लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ४६५९ इतकेच डोस आज देण्यात आले. तर अद्यापही ९७४० इतके डोस शिल्लक आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लस घेण्याबाबतचे गांभीर्य हळूहळू कमी होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये लसीकरण हे सर्वात प्रभावी अस्त्र आहे. कोरोनाच्या दुसरी लाट आल्यानंतर लसीकरणाचे महत्व नागरिकांनी जाणले. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर लसीकरणाला मोठी गर्दी झाली होती. अगदी प्रवासासाठी लसीकरण सक्तीचे करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात लसीचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागली होती. मात्र एकिकडे दुसरी लाट ओसरत चालल्यानंतर दुसरीकडे डोस मोठ्य़ा प्रमाणाण उपलब्ध झाले. पण लस घेण्या-यांची संख्या अत्यंत कमी होत गेली.

corona vaccination
अनील देशमुखच्या ईडीविरोधातील याचिकेवर 4 ऑक्टोबरला ऑनलाईन सुनावणी

परिणामी, लसीचे डोस मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत गेले. त्यामुळे आज शहरात लसीकरणाची मोठी मोहिम हाती घेतली होती. यामध्ये तब्बल ३० केंद्रांच्या ठिकाणी जागेवर नोंदणी करुन डोस देण्याची व्यवस्था केली होती. त्यासाठी ९२५० डोस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. साधारणपणे प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रासाठी १५०० डोसचे उद्दिष्ट देण्यात आले होते. नगरसेवकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून लसीकरणाबाबत आवाहन केले होते. प्रत्यक्षात मात्र उद्दिष्ट पूर्ण होतांना मोठी दमछाक झाल्याचे दिसून आले. या विशेष मोहिमेनंतरही शहरात अद्यापही ९७४० डोस शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली.

विशेष लसीकरण मोहिम दृष्टीक्षेप

(२९ सप्टेंबर)

नागरी आरोग्य केंद्र * उद्दीष्ट * लसीकरण * शिल्लक डोस

तांबे माळ * १५०० * ८६६ * १२४०

कलावंत गल्ली * १५०० * ६४० * १७८०

लालनगर * १६०० * ५९७ * १२९०

चांदणी चौक * १५०० * ९८८ * १६५०

जवाहरनगर * १५०० * ७२१ * १३४०

शहापूर * १५०० * ८२७ * १३५०

आयजीएम रुग्णालय * १५० * २० * १०९०

एकुण * ९२५० * ४६५९ * ९७४०

एकूण लसीकरण

(२८ सप्टेंबर अखेर)

४५ वर्षावरील

पहिला डोस - ६७७४१ (६४ टक्के)

दुसरा डोस - ४८४१६ (४६ टक्के)

१८ वर्षावरील

पहिला डोस -५७२६५ (४५ टक्के)

दुसरा डोस - ५२४१ (४ टक्के)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com