esakal | Kolhapur | कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत

कोल्हापूर : कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजारांची मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासाठी, संबंधित व्यक्तीचे कोरोनामुळे मृत्यू झालेले दवाखान्याचे प्रमाणपत्र, दवाखान्यातील कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय शासनाकडून लवकरच यासाठी ऑनलाईन लिंक दिली जाणार आहे. या लिंकमध्ये दिलेली सर्व कागदपत्रे व माहिती भरून याचा लाभ मिळवता येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ७८७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांच्यासाठी सुमारे २८ कोटी ९३ लाख ५ हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

हेही वाचा: ''राज्यातील पोलिस निवासस्थानासाठी आठशे कोटींची तरतूद''

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आणि महाराष्ट्र शासनाकडून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. अनुदान वाटप करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. शासनाकडून यासाठी लिंक दिली जाणार आहे. या लिंकमधील माहिती भरून दिल्यास लाभ मिळणार आहे. कागदपत्र कोणती असावीत, याच्या सूचनाही याच लिंकवरून दिल्या जाणार आहेत. ही आहे अडचण कोरोनामुळे एखादा रुग्ण घरातच मयत झाला असेल किंवा कोरोना झाला; पण त्यांच्याकडे डॉक्‍टरांचे प्रमाणपत्र नसेल, तर अशा रुग्णांच्या नातेवाईकांना कसा मदत निधी मिळणार?

loading image
go to top