Kolhapur Corporation Election : प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Corporation Election
Kolhapur Corporation Election : प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्प्यात

Kolhapur Corporation Election : प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना अंतिम टप्प्यात आली आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत ही रचना करा, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला केली होती. यात वाढ करत आता प्रभागरचना सादर करण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत ही मुदत वाढविली आहे. प्रारूप प्रभागरचना अंतिम टप्प्यात आली आहे. शेवटचा हात मारून रचना अंतिम होईल. कोरोनामुळे वर्षभर लांबलेल्या महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला या आदेशामुळे गती मिळणार आहे.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

महापालिकेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० ला संपुष्टात आली. यानंतर वर्षभर महापालिकेचा कारभार प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. कोरोची पहिली लाट आणि दुसरी लाट यामुळे निवडणूक वर्षभर लांबणीवर पडली. निवडणुकीसाठी या पूर्वीची एक सदस्य पद्धत रद्द करून नवीन त्रिसदस्य पद्धतीची निवडणूक घेण्याचा आदेश राज्य शासनाने काढला आहे. त्यानुसार महापालिकेची निवडणूक होणार आहे. यापूर्वी ८१ प्रभाग ८१ नगरसेवक होते. आता त्रिसदस्य पद्धतीचा अवलंब केला जाणार असल्याने प्रभागांची संख्या ३१ होणार आहे. ३० प्रभागांत तीन सदस्य निवडून द्यायचे आहेत, तर उर्वरित एका प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या आता ९२ एवढी होणार आहे. या निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रभागरचना आहे. यावरच जय-पराजयाची गणिते ठरणार आहे. १७,९०० एवढी लोकसंख्या एका प्रभागांत राहील. या प्रभागातून तीन सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. प्रभागरचना गुगल मॅपच्या आधारे केली जाणार आहे.

हेही वाचा: टीम इंडियाकडून ब्लॅक कॅप्सला व्हाइट वॉश!

उत्तरेकडून सुरूवात

प्रभागरचनाची सुरुवात करताना उत्तरेकडून केली जाईल. त्यानंतर पूर्व आणि पश्चिम दिशेने रचना करत करत शेवटी दक्षिण बाजूला प्रभागरचनेचा शेवट करण्यात येईल. या प्रभागरचनेकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे. इच्छुक मंडळी तर गेले वर्षभर प्रतीक्षा करत आहेत.

loading image
go to top