

Kolhapur political leaders war of words
esakal
Satej Patil Political Attack : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक हायव्होल्टेज ठरलेल्या लढतीत शारंगधर देशमुख यांनी विजय खेचून आणला, काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केलेले शारंगधर देशमुख यांच्यासमोर सतेज पाटील यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे राहुल माने यांनी तगडे आव्हान उभे केले होते. प्रचारात आणि सोशलमीडियावर आघाडीवर असलेले राहुल माने यांना मात्र मतांची आघाडी घेता आली नाही. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये देशमुख पिछाडीवर होते. मात्र, अखेरच्या फेऱ्यांत त्यांनी निर्णायक आघाडी घेत विजय खेचून आणला.