Security Guard Assault
esakal
कोल्हापूर : सीपीआर आवारात प्रवेश करणाऱ्या चारचाकी वाहनांची नोंद घेणाऱ्या सुरक्षारक्षकाला वाहनचालकाने शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. एवढेच नव्हे, तर सुरक्षारक्षकाला चारचाकीच्या बॉनेटवर बसवून फरपटत पुढे नेले. या घटनेत सुरक्षारक्षक जखमी (security guard assault incident at CPR Hospital Kolhapur) झाला. सुरक्षारक्षक आणि वाहनचालकातील वादामुळे सीपीआर रुग्णालयाच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला.