Kolhapur City : लोकसंख्या वाढतेय, पण स्मशानभूमी तसेच; पंचगंगावर वाढता ताण, नागरिकांची फरफट सुरूच
Cremation Grounds Crisis : शहर व उपनगरांतील निम्म्याहून अधिक मृतदेह पंचगंगेत येत असल्याने येथे बेड, पार्किंग आणि व्यवस्थापनाचा ताण दिवसेंदिवस वाढतो आहे.बहुसंख्य नागरिक अजूनही पारंपरिक पद्धतीवर ठाम असले तरी वीज दाहिनीचा स्वीकार हळूहळू वाढू लागला आहे.
कोल्हापूर : एकीकडे लोकसंख्या वाढत असताना शहरातील सर्वधर्मीयांच्या स्मशानभूमी आणि दफनभूमीच्या मरणकळा अजूनही संपलेल्या नाहीत. पंचगंगा स्मशानभूमीवरच अजूनही सर्वाधिक ताण आहे.