

सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोरीची माहिती पुढे आली. याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
esakal
Kolhapur Crime News : गुजरीत मोपेडच्या डिकीत पैसे ठेवल्यानंतर मोबाईलवर कॉल आला. कॉलवर बोलत बाजूला गेल्यावर, एका मिनिटातच चोरट्याने मोपेडची किल्ली काढून डिकीतील ९८ हजार ४०० रुपयांची रोकड पळविली. फिर्यादी चंद्रकांत सुखदेव गुरव (वय ४१, रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) हे घरी गेल्यानंतर त्यांना रोकड चोरीस गेल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर चोरीची माहिती पुढे आली. याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.