Kolhapur: केसचा निकाल तुमच्या बाजूने; पोलिस नाईकाने मागितली 1 कोटीची लाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe case in kolhapur

तक्रारदार यांनी २५ फेब्रुवारी २०२२ यांनी संबधिताची कोल्हापुरात भेट घेतली.

Kolhapur: केसचा निकाल तुमच्या बाजूने; पोलिस नाईकाने मागितली 1 कोटीची लाच

कोल्हापूर - शेतजमीनीचा दाव्याचा निकाल बाजूने लावून देतो म्हणून एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगरक्षक पोलिस नाईकवर गुन्हा दाखल करण्यात आला. जॉन वसंत तिवडे (रा. कोरोची, हातकणंगले) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे उप-अधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले.

लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांचे देहूगांव (ता. हवेली, पुणे) येथील शेतीबाबत महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे खंडपीठ येथे तीन दावे सुरू होते. दरम्यानच्या काळात त्यांच्याशी एका अनोळखीने फोनवरून संपर्क साधला. त्यांने एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचे आहे. तुम्ही भेटा असे सांगितले. तक्रारदार त्याच्या संपर्कात होते.

हेही वाचा: लवकरच, लवकरच, लवकरच...; मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

तक्रारदार यांनी २५ फेब्रुवारी २०२२ यांनी संबधिताची कोल्हापुरात भेट घेतली. त्यावेळी तो पोलिसी वर्दीतील येऊन त्यांना भेटला. त्याने दाव्याचा निकाल संदर्भात तक्रारदार यांना ‘तुमच्या विरूद्ध पार्टीने आम्हा एक कोटीची ऑफर दिली आहे. तुम्ही किती देता ते बोला.’ तसेच ‘केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, तुम्ही किती रुपये देवू शकता? समोरच्या पार्टीने एक कोटीची ऑफर दिली आहे. असे सांगून लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

विभागाने सदर तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये २२ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयातील संशयित पोलिस नाईक तिवडे याने एका हॉटेलमध्ये तक्रारदारांची भेट घेतली. त्याच्याकडे त्याने जमिनीबाबत एमआरटी कौसिल पुणे येथील दाव्यांचे निकाल येथील प्रशासकीय सदस्य साहेबांना सांगून तुमच्या बाजूने लावून देण्यासाठी विरुद्ध पार्टीने एक कोटी रुपयांची ऑफर दिली आहे.

तक्रारदारांना घरच्यांशी चर्चा करून विरुद्ध पार्टीच्या ऑफरप्रमाणे करा असे म्हणून लाचेची मागणी केल्याचे पुढे आले. त्यानुसार संशयित पोलिस नाईक तिवडेंवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयिताची नेमणूक पोलिस मुख्यालयात असून त्याचा शोध सुरू असल्याचे उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत यांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनानुसार उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत, अमंलदार विकास माने, सुनल घोसाळकर, मयुर देसाई, रुपेश माने आदींनी केली.

हेही वाचा: Politics : भास्कर जाधवांची राज्यपालांवर सडकून टीका; म्हणाले, राज्यपाल म्हणजे...

Web Title: Kolhapur Crime Acb Arrested To Police Naik Bribe Of One Crore Rupees Demand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..