esakal | Kolhapur : मिळकत फसवणूकप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Police FIR

कोल्हापूर : मिळकत फसवणूक प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : एकाची मिळकत दुसऱ्याच्या नावे केल्या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सहा संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अताउल्लाह बाळासो शेख, आरीफ ताजुदगीन शेख, किरण अशोकराव शेळके, प्रकाश जोतिबा जाधव, अमर नामदेव पाटील आणि अनोळखी महिला अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: 'नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी राज्यसरकारची अवस्था'

जास्मिन नायकवडी या मौजे मुडशिंगी (ता. करवीर) येथे राहतात. संशयित अताउल्लाह शेख, आरिफ शेख, किरण शेळके या तिघांनी त्यांची मुडशिंगी येथील मिळकत तारण घेऊन १० लाख रुपये त्यांना पाच टक्के व्याजाने देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार तिघांनी नायकवडी यांना दीड लाख रुपये देऊन संचकारपत्र केले. संशयितांनी १२ जुलै २०२१ ला कसबा बावडा, प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात नायकवडी यांच्या जागी दुसरी महिला उभी केली. तिच्या सहीचा वापर करून ही मिळकत संशयित शेळकेच्या नावावर केली, अशी फिर्याद नायकवडी यांनी दिली.

loading image
go to top